Rajya Sabha Elections 2020 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Rajya Sabha Election 2020: राज्यसभा निवडणूक 2020 साठी महाराष्ट्रातून सर्वच्या सर्व 7 जागांवरुन सर्व उमेदवार बिनविरोध निवडूण आले. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale), काँग्रेसचे राजीव सातव (Rajiv Satav), भाजपचे उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांच्यासह इतरही दिग्गज नावांचा समावेश आहे. सुरुवातीला या 7 जागांसाठी चुरशीची निवडणुक होईल असे वाटत होते. मात्र, सर्वच पक्षांकडे असलेला मतांचा कोटा विचारात घेता ही निवडणूक बिनिवोध पार पडली.

राज्यसभा निवडणूक 2020 साठी येत्या 26 मार्च रोजी मतदान होणार होते. मात्र, सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनिवोध पार पडली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या कोट्यातून शरद पवार आणि फौजिया खान यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेच्या कोट्यातून प्रियंका चतुर्वेदी यांना तर काँग्रेसने आपल्या कोट्यातून राजीव सातव यांना उमेदवारी दिली होती. भाजपने सर्वाधिक तीन उमेदवार दिले होते. यात सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि औरंगाबाद येथील डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी दिली. (हेही वाचा, एकनाथ खडसे भाजपला नकोच आहेत का? राज्यसभा उमेदवारीवरुन नव्या चर्चेला फुटले तोंड)

राजीव सातव ट्विट

राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या 55 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. एकूण 17 राज्यातील 55 जा खासदारांचा राज्यसभा कार्यकाळ एप्रील 2020 मध्ये समाप्त होत आहे. कार्यकाळ समाप्त होत असलेल्या राज्यसभा सदस्यांची सर्वाधिक सख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र-7, ओडीसा - 4, पश्चिम बंगाल- 6, आंध्र प्रदेश - 4, तेलंगणा - 2, असाम - 3, बिहार - 5, छत्तीसगढ - 2, गुजरात - 4, हरियाणा - 2, हिमाचल प्रदेश - 1, झारखंड - 2, मध्यप्रदेश - 3, मनिपूर - 1, राजस्थान - 3, मेघालय - 1 जागेसाठी ही निवडणूक होत आहे.