Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये आगामी सणासुदीचा काळ पाहता आता पुन्हा कोरोना रूग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गणपती पासून सुरू होणारे आगामी सण पाहता काही निर्बंधांवर वाढ करण्यात आली आहे. यावर राजेश टोपेंनी (Rajesh Tope) काही माहिती दिली आहे.

पुण्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप कोणते निर्बंध वाढवण्यात आलेले नाहीत. येथे रुग्ण कमी झालेले नाहीत पण वाढलेले देखील नाही. दरम्यान नागपूरातील कोरोना परिस्थितीवर देखील चिंता व्यक्त केली जात आहे. काल मंत्री आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी तिसर्‍या लाटेचं नागपूरात आगमन झाल्याचं म्हटलं आहे. यावर देखील राजेश टोपेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नितीन राऊत यांनी जरूर काही व्यक्तव्य केलं असतील पण निर्बंध लावण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत अशी स्पष्टोक्ती देखील त्यांनी दिली आहे. (नक्की वाचा:COVID-19 ची तिसरी लाट मागील 2 लाटांच्या तुलनेत अधिक भयावह असेल? मुंबई, पुणे साठी अलर्ट).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत देखील विचार सुरू आहे. पण टास्क फोर्स ने सगळ्या शाळेना sop दिलेल्या आहेत शाळेय शिक्षण विभागाने ते पूर्ण करून मुख्यमंत्री कडे दिलेलं आहे म्हणू शाळा सुरू करण्याचा निर्णय पण मुख्यमंत्री घेतील असे राजेश टोपे म्हणाले आहेत. नक्की वाचा: Nagpur: नागपूरमध्ये सुरु झाली Covid-19 ची तिसरी लाट; 3-4 दिवसांत लागू होणार लॉकडाऊन- Guardian Minister Nitin Raut.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन वैद्यकीय परिषदेमध्ये बोलताना मागील वर्षी प्रमाणे यंदा कोरोना संकटात रूग्णवाढ सणानंतर आटोक्यात ठेवण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनाही 'अनावश्यक गर्दी' टाळण्याचं, राजकीय समारंभ न कारण्याचं आवाहन केले आहे.