राज ठाकरे यांची गांधी घराण्यातील निकटवर्तीयाशी खासगीत बैठक, महाआघाडीत सामील होणार?
Raj Thackeray | File Photo | (Photo Credits- Facebook @Sachin Maruti More)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) याचा विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला. त्यावेळी राजकीय पक्षातील मंडळींसह बॉलिवूड कलाकारांनी लग्नसोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती. मात्र राज ठाकरे आणि गांधी घरण्यातील निकटवर्तीय यांच्यामध्ये झालेल्या खासगी बैठकीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच रंगू लागली आहे.

अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा 27 जानेवारी रोजी पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर राजकीय मंडळी उपस्थित होती. तसेच राज ठाकरे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनासुद्धा विवाहसोहळ्याचे आमंत्रण दिले होते. परंतु मोदी आणि मुख्यमंत्र्याना आमंत्रण दिले गेले नाही. तर विवाहसोहळ्यावेळी गांधी घरण्यातील निकटवर्तीयांमधील अहमद पटेल (Ahmed Patel) यांनी उपस्थिती लावली होती.

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि अहमद पटेल या दोघांमध्ये लग्नसोहळ्यावेळी चक्क 20 मिनिटे खासगीत बैठक झाली. मात्र बैठकीत कोणती चर्चा झाली याबद्दल गुप्तता ठेवण्यात आली आहे. तर अहमद पटेल आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. तसेच मनसे महाआगाडीत समावेश करण्याबद्दस बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा-राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिले चिरंजीव अमितच्या विवाहाचे निमंत्रण, पंतप्रधान मोदींना वगळल्याची चर्चा)

येत्या निवडणुकीत मनसे पक्षाला दोन ते तीन जागा देऊ करण्याची राष्ट्रवदी काँग्रेसकडून तयारी आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या सहमतीशिवाय राष्ट्रवादी हा निर्णय घेता येणार नाही असे राजकीय विश्लेषककडून सांगण्यात येत आहे.