Sharmila Thackeray (Photo Credits: IANS & ANI)

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नीच्या गाडीला नवी मुंबईत पनवेल नजिक अपघात झाला आहे. आज (5 ऑक्टोबर) सकाळी एकवीरा देवीचं दर्शन ( Ekvira Devi Darshan) घेऊन मुंबईत परतताना शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray)  यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ANI च्या वृत्तानुसार, शर्मिला ठाकरे सुखरूप असून अपघातामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. आता त्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

राज ठाकरे यांच्यासह त्यांची बहीण आणि कुटुंबीय देवीच्या दर्शनाला गेले होते. रिक्षाला धडक बसू नये म्हणून कार चालकाने अचानक ब्रेक मारला. यामध्ये गाडीला धडक बसली आहे. शर्मिला ठाकरे यांच्या गाडीच्या बोनेटजवळ नुकसान झालं आहे. गाडीचा पुढचा भाग आदळला आहे.

ANI Tweet

आज नवरात्रीतील सप्तमीचा दिवस आहे. या निमित्त लोणावळ्यातील एकवीरा देवीचं दर्शन घेण्यासाठी शर्मिला ठाकरे गेल्या होत्या. एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबाची कुलदेवी आहे. वर्षभरातील महत्त्वाच्या प्रसंगी, शुभ कार्याला, नवरात्रीमध्ये ठाकरे कुटुंब हमखास देवीच्या दर्शनाला जातात. मनसेच्या पहिल्या प्रचारसभेची बदलली तारीख; वाचा कधी आणि कुठे करणार राज ठाकरे त्यांचं भाषण

काही दिवसांपूर्वी मुंबई पुणे महामार्गावर संचेती हॉस्पिटलचे स्पाईन सर्जन डॉ. केतन खुर्जेकर यांचा दुर्दैवी अंत झाला होता.रस्त्याच्या कडेला उभे राहून गाडीचं चाक बदलायला मदत करणार्‍या ड्रायव्हरला आणि डॉ. खुर्जेकरांना मागून येणार्‍या गाडीने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.