आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष आपल्या प्रचारसभांच्या तारखा फायनल करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील आपल्या पहिल्या सभेची तारीख फायनल केली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवरून 5 ऑक्टोबर रोजी पहिली प्रचारसभा होणार असे जाहीर केले होते. परंतु सूत्रांनी लेटेस्टली मराठीला दिलेल्या माहितीनुसार आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली असून, पहिली सभा आता 9 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
पहा हे ट्विट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे 'महाराष्ट्र विधानसभा २०१९' निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा ५ ऑक्टोबर २०१९ रोजी घेणार.#मनसेदणका #रेल्वेइंजिन pic.twitter.com/NQLQBVfvDn
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) September 30, 2019
ही पहिली प्रचारसभा ठाण्यात आयोजित करण्यात येणार आहे परंतु योग्य ठिकाण अजून तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. तसेच कोणत्या मुद्द्यांवर राज ठाकरे जनतेशी संवाद साधतील हे देखील अजून सांगण्यात आलेलं नाही.
ठाण्यानंतर डोंबिवली व पुण्यातही राज ठाकरेंच्या प्रचारसभा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.