Raj Thackeray | Twitter

महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) जालना मध्ये उपोषणाला बसले आहेत. अन्नपाणी, वैद्यकीय मदतीशिवाय ते उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. हळूहळू त्यांची तब्येत ढासळत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांना उपोषण सोडा तब्येत जपा,आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे.समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. असं भावनिक आवाहन केलं आहे. Manoj Jarange Patil News: 'पाणी पितो पण दोनच दिवस'; मनोज जरांगे पाटील यांच्याकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या विनंतीस मान .

महाराष्ट्र राज्य सरकारला राज ठाकरेंचं आवाहन

 

"महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा. " असा पर्याय देखील राज ठाकरे यांनी सूचवला आहे.

राज ठाकरे यांचं सविस्तर ट्वीट

सध्या मराठा आरक्षण प्रश्नी समाज, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कुठे मराठा समाजाकडून आमदारांच्या गाड्या, घरं यावर दगड भिरकावले जात आहेत तर कुठे रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक सेवा रोखून धरली जात आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वाहतूकीसोबतच कायदा व सुवस्थेचा प्रश्न देखील उभा ठाकला आहे.