राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण अधिक वाढले असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आज कुढाळ दौऱ्यावर आहेत. कुढाळ येथे पत्रकारांशी बोलताना राज यांनी विविध विषयांवर भाष्य केले. इतिहास हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे. इतिहास सांगताना त्यात कुतुहल दाखवले नाही तर तो रुक्ष होतो. त्यामुळे कलाकारांना ते स्वातंत्र्य घ्यावे लागते, असेही राज ठाकरे बोलत होते. 'वेडात दौडले सात' चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी कुढाळ येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना केला. तसेच, पक्षातील गबाजी संपायला हवी. गटबाजी संपल्याशिवाय पक्ष वाढणार नसल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. आपली इतिहास तज्ज्ञ आणि अभ्यासकांसोबत नेहमी चर्चा होते. अनेक इतिहासकारांनी आपल्याला सांगितले की, वेढात दौडले वीर मराठी सात. याबातब इतिहासात स्पष्ट असा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे ते सात होते की आठ होते की आणखी किती होते. याबाबत उल्लेख मिळत नाही. शिवाजी महाराज यांनी प्रतापराव गुर्जर यांना एक पत्र लिहील्याचा उल्लेख येतो त्यातच याबाबत पुसट माहिती मिळते. त्यामुळे उगाचच राजकारण तापविण्यासाठी आणि जातीपातींमध्ये भांडणे लावण्यासाठी काही लोक उद्योग करतात असे राज ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, BMC Elections: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी बीएमसी निवडणूक एकट्याने लढवणार )
दरम्यान, शरद पवार हे आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कधीच घेत नव्हते. ते केवळ फुले, शाहू आणि आंबेडकर इतकेच म्हणायचे. पुणे येथील एका मुलाखतीतही मी त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले फुले, शाहू, आंबेडकर हा एक विचार आहे. जर फुले, शाहू, आंबेडकर हाच केवळ विचार असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हा विचार नव्हता किंवा नाही काय? असा सवालही राज यांनी या वेळी उपस्थित केला.