Raj Thackeray | (Photo Credit - X)

Raj Thackeray, Dada Bhuse Press Conference: महाराष्ट्रातील सर्व एन्ट्री पॉइंटवर राज्य सरकारतर्फे कॅमेरे लावले जातील. त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचे कॅमेरेही असतील. हे कॅमेरे टोलनाक्यांवरुन (Toll Plaza Issue) किती वाहने जातात याची नोंद ठेवतील. इतकेच नव्हे तर सदर महामार्ग, रस्त्याची उभारणी करण्यासाठी एकूण किती कोटींचे टेंडर निघाले होते. त्या टेंडरमधील किती पैसे टोलनाक्यावरुन वसूल केल्या जाणाऱ्या कररुपात किती पैसे कंपनीला मिळाली. तसेच, टेंडरमधील किती पैसे बाकी आहेत. किती दिसवांमध्ये रस्ता नागरिकांसाठी खुला होईल, यासंदर्भातील सर्व माहिती एका डिजीटल बोर्डच्या माध्यमातून टोलच्या दोन्ही बाजूला लावले जातील, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. राज्याचे मंत्री दादा भूसे यांच्यासोबत टोलच्या मुद्द्यावरुन आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान अनेक मुद्दे मांडले आणि राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेची माहितीही दिली. त्यातील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे-

  • टोल नाक्यांवर स्वच्छतागृहांची सोय असायला हवी- राज ठाकरे
  • टोल नाक्यांवर सरकारचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे कॅमेरे पुढचे काही काळ असतील- राज ठाकरे
  • या कॅमेऱ्यावरुन नोंद घेण्यात येईल की नाक्यावरुन किती वाहने सोडली जातात- राज ठाकरे
  • रस्ते निर्मितीसाठी किती रुपयांचे टेंडर होते. आतापर्यंत किती टोल वसूल झाला आणि किती पैसे भरायचे शिल्लख आहेत याची नोंद दररोज डिजिटल बोर्डमार्फत नागरिकांना देण्यात येईल.- राज ठाकरे
  • आनंदनगर टोल नाक्यावर एकदाच टोल भरावा- राज ठाकरे
  • टोलनाक्यावर कोणतेही वाहन 4 मिनीटांपेक्षा अधिक काळ असणार नाही- राज ठाकरे
  • वांद्रे वरळी, सीलीक आणि एक्सप्रेस वेची चौकशी कॅगमार्फत करावी- राज ठाकरे
  • काही मागण्यांवर एक महिन्यांत निर्णय होईल- राज ठाकरे
  • राज्य सरकारने राज्याच्या अखत्यारीत असलेल्या प्रश्नांवर निर्णय घ्यावेत. केंद्राच्या अखत्यारीत
  • असलेल्या प्रश्नांवर केंद्राशी बोलावे-- राज ठाकरे
  • टोल नाक्यांवर टोल वसुलीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल- राज ठाकरे

एक्स पोस्ट

राज ठाकरे यांच्यासोबत टोल नाक्यांवरुन झालेल्या चर्चेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यातील मुद्द्यांवर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर बदल करुन सोडवणू केली जाईल, अशी माहिती दादा भूसे यांनी दिली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर दादा भूसे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणीस यांच्याकडून चुकून ते विधान झाले असावे. त्यांची भूमिका वेगळी होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी तेवढाच मुद्दा उचलून धरला अशा आशयाचे वक्तव्य भूसे यांनी केले. तसेच, टोल नाक्यावर जे कर्मचारी बसतात त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल. तसेच, नागरिकांशी सौजन्याने वर्तन करावे अशा सूचना टोल चालकांना दिल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.