ओडिशात (Odisha) बालासोरमध्ये बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि मालगाडीची टक्कर झाली. या अपघातातील मृतांची संख्या 261 इतकी झाली आहे तर 900 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेबाबत आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ओडिशातील बालासोर जवळ ट्रेन अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ह्या दुर्घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. ह्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
पाहा ट्विट -
ओडिशातील बालासोर जवळ ट्रेन अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ह्या दुर्घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. ह्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 3, 2023
दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण तपासण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या अपघाताच्यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले असून त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.