Raj Thackeray And Uddhav Thackeray Together: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रविवारी दादरमध्ये राज ठाकरेंची बहीण, जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र दिसले. या लग्नाला दोन्ही कुटुंबांनी हजेरी लावली. राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा विवाह सोहळा मुंबईतील दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात पार पडला. पुतण्याला आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही काका एकत्र आले. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. या लग्नाचे काही व्हिडिओ आणि फोटो आता समोर आले आहेत, ज्यात उद्धव आणि राज शेजारी उभे असल्याचं दिसत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांना हसू आवरेना, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज ठाकरे नुकतेच रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला गेले होते. श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक याचे लग्न गेल्या रविवारी मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये पार पडले. राज ठाकरे यांनी पाटणकर कुटुंबीयांच्या निमंत्रणाचा मान राखून सोहळ्याला हजेरी लावली. मात्र, या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये प्रत्यक्ष भेट झाली नाही, कारण दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या वेळी या सोहळ्याला हजेरी लावली होती. (हेही वाचा -महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर Raj Thackeray यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन; केली खास पोस्ट)
नातेवाईकाच्या लग्नात एकत्र दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे -
#WATCH | Mumbai: Raj Thackeray, Uddhav Thackeray Seen At Wedding Of MNS Chief’s Nephew In Dadar; Videos Surface#UddhavThackeray #RajThackeray #MumbaiNews #ShivSenaUBT pic.twitter.com/vYWLOU5abt
— Free Press Journal (@fpjindia) December 22, 2024
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शाब्दिक टीका केली. दोन नेत्यांच्या नेतृत्वाखालील पक्षांनी निवडणूकीत अत्यंत खराब कामगिरी केली. या निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. तसेच शिवसेना (UBT) फक्त 20 जागा जिंकल्या. (हेही वाचा -Raj Thackeray Tweet: माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका राज ठाकरेंची ताकीद, उद्धव ठाकरेंवरील हल्ल्यानंतर सोशल मिडीयावर पोस्ट)
तथापी, मुंबईतील माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, उद्धव यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुरली देवरा यांच्या विरोधात चुरशीची लढत देत वरळीची जागा राखली.