महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर Raj Thackeray यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन; केली खास पोस्ट

महायुतीच्या नव्या सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झाले

महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर Raj Thackeray यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन; केली खास पोस्ट
Raj Thackeray | X

मुंबई मध्ये आज देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ विधी पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन  केले आहे. दरम्यान विधानसभा निवडणूकीमध्ये मनसेचा दारूण पराभव झाला आहे. एकही आमदार निवडून न आल्याने यंदा विधिमंडळात मनसे नसेल पण राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी 'पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...' असा इशाराही दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट  

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2024 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).