Raj Thackeray & Amit Thackeray On Tennis Court: राज ठाकरे यांचा अमित ठाकरे यांच्यासोबत रंगला डाव; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Raj Thackeray & Amit Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे ( Amit Thackeray) यांचे टेनिस कोर्टवरील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दोघेही स्पोर्ट जर्सीत हातात रॅकेट घालून दिसत आहेत. गेले काही दिवसांपासून टेनिस एल्बोचा सामना करत असलेले राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर टेनिस कोर्टवर दिसले. राज ठाकरे हे राजकारणात असले तरी ते एक चांगले व्यंगचित्रकार आहेत. तसेच, त्यांचे खेळावरील प्रेमही सर्वश्रूत आहेत. गेले अनेक वर्षे ते टेनिस खेळतात. प्राप्त माहितीनुसार, हे फोटो शिवाजी पार्क जिमखान्यात लॉन टेनिस खेळतानाचे आहेत. राज ठाकरे यांचे चाहते आणि कार्यकर्ते त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर पहिली निवडणूक वगळता पुढील निवडणुकीपासून त्यांच्या पक्षाला अद्याप म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यांचा एखाद्दूसरा आमदार निवडूण येतो. महालापालिका निवडणुकांतही नगरसेवकांची अशीच स्थिती. परंतू, असे असले तरी राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात आणि ते टीकवून ठेवण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे सत्ता नसतानाही राज्यभरातील अनेक नागरिक राज ठाकरे यांना भेटायला येतात.  (हेही वाचा, Raj Thackeray meet Governor Bhagat Singh Koshyari: 'शरद पवार यांना भेटा' राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना सूचवले)

हाच तो व्हायरल झालेला फोटो

Raj Thackeray & Amit Thackeray

राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर घेतलेली भूमिका नेहमीच चर्चेत राहणारी असते. दरम्यान, अलिकडेच त्यांनी आपले चिरंजीव अमित ठाकरे यांनाही राजकारणात प्रवेश दिला. अमित ठाकरे यांच्याकडे मनसे नेते म्हणून पाहिले जाते.