नागरिकत्व दुरूस्ती कायदा (Citizenship Amendment Act) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (NRC) रस्त्यावर उतरले आहेत. राजकीय नेते राज बब्बर (Raj Babbar), नसीम खान (Naseem Khan), मिलिंद देवरा (Milind Deora), एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्यासह बॉलिवूड कलाकार सयीद मिर्झा (Saeed Mirza), सुहासीनी मुळे (Suhasini Mulay), फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि सुशांत सिंह (Sushant Singh) यांनी मुंबई (Mumbai) येथील ऑगस्ट क्रांती मैदानात (August Kranti Maidan) उपस्थिती दाखवत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात अंदोलन सुरु केले आहे. यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यावेळी हजेरी लावली आहे.

नागपूर, पुणे, औरंगाबाद, बीड आणि मालेगाव येथे जातीय मार्गाने समाजात फूट निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कायद्यांऐवजी तरुणांना नोकरी आणि महिला सुरक्षा हवी आहे, अशीही मागणी अंदोलकांनी केली आहे. तसेच हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन इत्यादी भारतीय एकजूट आहेत. हे समुदाय शतकानुशतके एकत्र राहिले आहेत. त्यांना कोणत्याही कायद्याने विभागले जाऊ शकत नाही, असे मत अंदोलकांनी मांडले आहेत. तसेच ऑगस्ट क्रांती मैदानातून भारताने स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात केली होती, सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे राज बब्बर यांनी पत्रकारांना सांगितले आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात महाष्ट्रातील अनेक नागरिकांनी उपस्थित दाखवली होती. यात मुस्लिम महिला आणि पुरूषांची उल्लेखनीय संख्या होती. हे देखील वाचा- मुंबई: नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकांचे आंदोलन

एएनआयचे ट्वीट-

आरएसएस विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. त्यावेळी या कायद्याला विरोध करणारे दलित विद्यार्थी एकमेकांच्या समोर आले. परंतु, त्याठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली.