मुंबई (Mumbai) येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर (August Kranti Maidan) गुरुवारी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (Citizenship Amendment Act) निषेध केला. पुणे आणि नागपुरातही असेच निदर्शने करण्यात आली. ऑगस्ट क्रांती मैदानावर जमलेल्या निदर्शकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात 'हुकूमशाही चालणार नाही' अशा घोषणा दिल्या. हातात फलक आणि बॅनर घेऊन मुंबईतील हजारो विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्ते ऑगस्ट क्रांती मैदानाकडे कूच करताना दिसले.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात देशभरातून अंदोलन केली जात आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध करत दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हे अंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात याला होता. याला निषेध दर्शवत मुंबई येथील टाटा इस्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी कॅंडल मार्च काढत मोर्च काढला होता. यानंतर आज मुंबईतील नागरिकांनीही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात अंदोलन सुरु केले आहे. सध्या नागरिकांचा ऑगस्ट मैदानात मोठा जमाव त्याठिकाणी पाहायला मिळाला होता.  हे देखील वाचा- नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात महाराष्ट्र पेटले; मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथील नागरिक आक्रमक

एएनआयचे ट्वीट-

अंदोलकांनी शांतीपूर्वक आंदोलन करण्यात यावे, असे अवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. विरोधकांच्या मते हा कायदा मुस्लीम विरोधी असून संविंधानाच्या कलम 14 चे उल्लंघन करणारे आहे. तसेच धर्माच्या आधारावर भेदभाव केले जाणे हे अयोग्य नसून हिंदु व्होट बॅंक वाढवण्याचा उदेशाने भाजपने हा कायदा बनवला गेला आहे, असा आरोप अंदोलकांकडून केला जात आहे.