नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ( Nashikr Railway Station) शनिवारी (5 नोव्हेंबर) सकाळी रेल्वे बोगीला (Railway Coach Caught Fire) आग लागली. त्यामुळे काही काळ प्रवाशी आणि प्रशासनामध्येही घबराटीचे वातावरण होते. रेल्वे कर्मचारी आणि सजग प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्पर्तेमुळे संभाव्य दुर्घटना टळली. कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, आगीद झालेल्या नेमक्या नुकसानीचा आकडाही पुढे आला नाही.

प्राप्त माहितीनुसार, हावडा मेल एक्सप्रेस रेल्वे स्थानकामध्ये फलाटावर उभी होती. दरम्यान, रेल्वेच्या पार्सल बोगीतून धूर येत असल्याचे प्रवाशी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रेल्वेच्या इतर बोगीतील प्रवाशांना खाली उतरवले. तसेच, अग्निशमन दलाला तातडीने या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

ट्विट

पाठिमागील काही दिवसांपासून आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही घटनांमध्ये स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणा टळली. मात्र काही ठिकाणी यातील दोन्ही प्रकारची हानी टाळता आली नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचेही पाहायला मिळाले आहे.