रायगड: सहायक पोलीस निरीक्षकाने पोलीस मुख्यालयात गळफास लावून केली आत्महत्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

रायगड पोलीस (Raigad Police) दलाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर (Prashant kanerkar) यांनी काल, म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील (Police Headquaters) अधिकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली . या घटनेने जिल्हा पोलिस कार्यकक्षेत खळबळ माजली आहे. मात्र कणेरकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .Dr. Payal Tadvi Suicide Case: डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील 3 आरोपी डॉक्टरांना सशर्त जामीन मंजूर; मात्र मुंबई बाहेर जाण्यास मनाई

प्राप्त माहितीनुसार, कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वी मुंबईतुन अलिबाग येथे अर्ज शाखेत रुजू झाले होते. त्यानंतर काही काळ रजा घेऊन ते 15 ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते. या दरम्यान त्यांना काही समस्या असल्याचे कोणाला जाणवले सुद्धा नव्हते मात्र 16 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबागचे पोलीस निरीक्षक पी. डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला.