Raigad Building Collapse | Photo Credits: Twiter/ ANI

रायगड (Raigad )मध्ये काल (25 ऑगस्ट) संध्याकाळी 5 मजली रहिवासी इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. दरम्यान यामध्ये ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप 18 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या बचावकार्यासाठी स्थानिक लोकं, पोलिस प्रशासनासोबतच एनडीआरएफची टीम (NDRF Team)  देखील काम करत आहे.

इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, नेते एकनाथ शिंदे पोहचले आहे. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जखमींवर नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर गंभीर दुखापत असणार्‍यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बचतकार्य वेगवान करण्यासाठी मुंबईहून अतिरिक्त 3 एनडीआरएफच्या टीम्सना पाचारण करण्यात आले आहे.

ANI Tweet

दरम्यान इमारतीचं काम निकृष्ट असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या इमारत दुर्घटनेमध्ये विशेष टीम कडून चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मांडली आहे.

पाच मजली इमारतीत जवळजवळ 45 ते 50 फ्लॅट होते. पिलर कोसळत असल्याचं लक्षात येताच रहिवाशांनी धावाधाव करत बाहेर पाडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काहीजण सुखरूप बाहेर पडले मात्र स्थानिकांनी पूर्ण इमारत जमीनदोस्त होताना पाहिली.