Padma Awards 2021: समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Sindhutai Sapkal (Photo Credit: Twitter)

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची ( padma awards 2021 ) घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) एकूण सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान, समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अनाथांची माय म्हणून ओळख मिळवलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. सिंधुताई सपकाळ यांना मिळालेला हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सिंधुताई सपकाळ यांना समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हे देखील वाचा- PM National Bravery Award 2021: अभिमानास्पद! महाराष्ट्रातील 5 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

ट्विट-

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी एक धक्काच आहे. कारण माझे शिक्षण चौथी पासपर्यंतच झाले आहे. यामुळे हे कसे शक्य झाले? मला माहिती नाही. मी समाजकार्यात अनाथ मुले आणि महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्वजण माझ्यासोबत राहू लागले. दरम्यान, मी त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम केले. मला या प्रवासात समाजातील सर्वांनी सढळ हाताने मदत केली. मी त्यांना हा पुरस्कार अर्पण करते, असे सिंधुताई सपकाळ लोकसत्ताशी बोलताना म्हणाल्या आहेत.