पुणे: राजगडाच्या बुरुजावर पडलेल्या चार्जर काढण्याच्या प्रयत्नात तरुणाचा दरीत पडून मृत्यू
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

Pune: ट्रेकर्सकडून विकेंड्सच्या दिवशी गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे कॅम्प आयोजित केले जातात. त्यामुळे सध्या तरुणाई ट्रेकिंगकडे वळलेली दिसून येत आहे. परंतु ट्रेकिंगच्या वेळी काही गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. अशातच आता राजगडाच्या बुरुजावर पडलेला चार्जर काढण्याच्या प्रयत्नात एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. या तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.(Navi Mumbai Cop Commits Suicide: नवी मुंबई पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार; सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून एका पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या)

अंद्रिन राक्षस असे तरुणाचे नाव असून तो मुंबईतून आपल्या मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेला होता. त्यावेळी मोबाईलचा चार्जर त्याच्या हातातून निसटून पडला असता तो काढण्यासाठी बुरुजावर गेला. तेव्हा अंद्रिन याचा पाय घसरुन दरीत पडला. या घटनेनंतर काही तरुणांनी त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर तो घरातल्यांच्या ताब्यात दिला गेला.(जळगाव येथील भीषण दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं सह राष्ट्रपतींनी ट्विटद्वारे व्यक्त केला शोक, See Tweets)

दुसऱ्या बाजूला लव्हासा प्रकल्पाच्या येथे असलेल्या वरसगाव धरणात सुट्टीच्या निमित्ताने चार मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही तरुण मुले ख्राईस्ट युनिव्हर्सिटी कॉलजेमधील शिकणारी आहेत. निहाला थापा आणि सी. रक्षीत अशी मृत मुलांची नावे आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात  मुंबई गोवा हायवे  मार्गावरील कशेडी घाटात एका खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. ही बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते. ही घटना पहाटे 4 च्या सुमारास झाला. ही बस मुंबई मधील सायन येथून कणकवली ला जात होती. या बसमध्ये 27 प्रवासी होते.