Navi Mumbai Cop Commits Suicide: नवी मुंबई पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार; सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून एका पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

नवी मुंबई पोलीस ठाण्यातील (Navi Mumbai Police Station) एका पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या दालनातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रविवारी (14 जानेवारी) घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी डीसीपी शिवराज पाटील (DCP Shivraj Patil) यांनी कसून चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अशाप्रकारच्या घटना चिंताजनक असून याबाबत तपास केला जात आहे.

दरम्यान, नवी मुंबई पोलीस ठाण्यात आज एका पोलिसांनी स्वत:च्या छातीवर गोळी झाडून घेतली. हा प्रकार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या लक्षाच येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना संबंधित पोलीस कर्मचारी हे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने वाशीतील एमजीएम रुग्णालयात  घेऊन गेले होते. मात्र, तिथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Boy Rapes Girl in Train Toilet: ट्रेनच्या शौचालयात मुलीवर बलात्कार, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल, ठाणे पोलिसांची कारवाई

एएनआयचे ट्विट-

या घटनेवर नवी मुंबई पोलीस ठाण्याचे डीसीपी शिवराज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतावर गोळी झाडून घेतली, त्या ठिकाणी आम्हाला कोणतीही सुसाईट किंवा काही पुरावा मिळालेला नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून चौकशी सुरु आहे, असे पाटील म्हणाले आहेत.