Boy Rapes Girl in Train Toilet: ट्रेनच्या शौचालयात मुलीवर बलात्कार, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल, ठाणे पोलिसांची कारवाई
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

प्रवासी ट्रेनच्या शौचालयात (Rape In Train Toilet) एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोरखपूर एक्सप्रेस ट्रेन (Gorakhpur Express Train) प्रवासादरम्यान ही घटना घडली. घटनेची गंभीर नोंद घेत ठाणे पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या तरुणावर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आरोप आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी रविवारी दिली.

तक्रारीचा दाखला देत ठाणे पोलिसांतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजणेच्या सुमारास घडली. मुलगा आणि मुलगी एकत्र फिरत होते. त्यानंतर तो मुलगा तिला ट्रेनच्या शौचालया घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Navi Mumbai: खारघर येथे पार्क केलेल्या बसमध्ये 19 वर्षीय महिलेवर दोन जणांकडून बलात्कार; एका आरोपीला अटक)

संबंधित घटनेबाबत पहिल्यांदा मुंबई शहरातील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. नंतर ही तक्रार ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक झाली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.