Pune Weather Prediction, August 09: भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार आ, 8 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाटांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पुण्यात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.IMD ने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, जोरदार पाऊस आणि संभाव्य वादळाचा इशारा दिला आहे ज्यात वाऱ्याचा वेग वाढेल. काही भागात 30-40 किमी/ता वेगाने वारे वहातील.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.