Photo Credit- x

Pune Weather Prediction, July 8 : पुणे आणि परिसरात आजपासून पुढील तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडण्याची दाट शक्यता आहे. तर घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. IMD ची 6 जुलै रोजीची प्रेस रिलीझ म्हणते, 07 ते 10 तारखेदरम्यान कोकण आणि गोव्यात एकाकी मुसळधार पावसाची शक्यता आहे.दिवसाची सुरुवात 26 अंश सेल्सिअस किमान तापमानाने झाली आणि कमाल 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या ताज्या पुणे हवामान अपडेटमध्ये, रविवारी पुण्यात घाटविभागत मुसळधार पावसचा अंदाज वर्तवला आहे. आज ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तसेच नाशिक व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा आज कायम आहे. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील ह्यासाठी हवामान खात्याने पुण्यात उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Weather Forecast For Tomorrow: ठाणे, नवी मुंबई पनवेलमध्ये गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद; जाणून घ्या उद्याचा राज्यातील हवामान अंदाज!

पुण्यात उद्याचे हवामान कसे? 

 

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज, 7 जुलै, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला. आयएमडीच्या अंदाजानुसार राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे.IMD ची 6 जुलै रोजीची प्रेस रिलीझ म्हणते, 07 ते 10 तारखेदरम्यान कोकण आणि गोव्यात एकाकी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ७ जुलै पासून पुढील पाच दिवस कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.