Pune Weather Prediction,July22 : पुण्यात आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने आज रविवार पासून ते मंगळवार 23 जुलै पर्यन्त पुण्यात ढगाळ वतावरणास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं धरणांमधील (Dam) पाणीपातळीत देखील वाढ होत आहे. पुण्यात आज 21 जुलै 2024 रोजी तापमान 23.91 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.53 °C आणि 24.21 °C दर्शवतो.मात्र पुण्यात घाटमाथ्यावर आज ही अती मुसळधार पावसाची शक्यता आहे.आता पुण्यात उद्याचे वातावरण कसे असतील यासाठी हवामान विभागाने पुण्यात उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Tulsi Lake Overflow: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो (Watch Video)

पुण्यात उद्याचे हवामान कसे?

गेल्या 2 दिवसांपासून विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागला आहे. अतिवृष्टी सदृश्य  पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील  बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे