पुणेकरांनो (Pune News) ऊन चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे उकाडा आणि घामाच्या धारा वाढणे स्वाभाविक. अशा वेळी दिवसातून दोन तीन वेळा अंघोळ करावी किंवा पण्याचा भरपूर वापर करावा असे वाटणेही स्वाभाविक. पण, तुमच्या मनातील या गोष्टी मनातच ठेवा आणि पुणे महापालिका काय सांगते याकडे लक्ष द्या. येत्या 6 मार्च 2024 रोजी पुणे (Pune) महापालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पाणीकपात (Pune Water Supply) असणार आहे. पालिका हद्दीतील कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिर कान्हा हॉटेलसमोरील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही दुरुस्ती अतितातडीची असल्याचे समजते. त्यामुळे संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी ती त्वरीत होणे आवश्यक आहे. परिणामी शहरात येत्या बुधवारी पाणीकपात असणार आहे. शिवाय दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (7 मार्च 2024) पाणीपुरवठा पूर्ववत होईल. मात्र, तो सकाळी उशीरा आणि कमी दाबाने सुरु राहील याचीही नोंद घेण्यात यावी असे पालिकेने म्हटले आहे.
पाणीकपातीमुळे बाधीत होणारे क्षेत्र
केके मार्केट परिसर, बिबवेवाडी (आंशिक), कात्रज, कोंढवा बुद्रुक, राजीव गांधीनगर (यूपी), सुपर इंदिरानगर, कोंढवा बुद्रुक गावठाण, लक्ष्मी नगर, आदी परिसर पाणीकपात झाल्याने बाधित असणार आहे. (हेही वाचा, Mumbai Water Cut: मुंबईच्या पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग; शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा नाही)
पाणीपुरवठा खंडीत केला जाणारा भाग
कोंढवा बुद्रुक आणि अप्पर इंदिरानगर परिसर- साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर (भाग), इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, अजमेरा पार्क, अशरफनगर, शांतीनगर,साळवे गार्डन परिसर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, सावकाशनगर, गुलमोहर कॉलनी, अण्णाभाऊ साठेनगर अप्पर डेपो परिसर, महानंदा सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रीकुंजनगर.
तळजाई झोन- पुनईनगर, बालाजीनगर (भाग), शंकर महाराज मठ परिसर, अप्पर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज, राजयोग सोसायटी, लोकेश सोसायटी, शिवशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदरनगर, प्रोजेक्ट सोसायटी, हस्तिनापूर, मनमोहन पार्क, तोडकर रेसिडेन्सी, स्टेट बँक कॉलनी, महालक्ष्मी नगर, पद्मजा पार्क, लेकटाउन चैत्रबन कॉलनी, अप्पर आणि सुपर इंदिरानगर परिसर, चिंतामणीनगर भाग 1 व 2
दरम्यान, दुरुस्तीच्या कामामुळे पुण्यात पाणीकपात जरुर झाली असली तरी, सालाबदप्रमाणे होणारी उन्हाळ्यातील पाणीकपात मात्र टळली आहे. होय, कालवा समितीची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पाणीकपात न करण्याचा निर्णय झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे उपमख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय झाला.