पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Council of Examination) आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) आणि त्याच्या भावा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. हडपसर पोलिस स्टेशन मध्ये शैलजा आणि त्याच्या भावा विरूद्ध Popat Suryavanshi यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार FIR दाखल झालेला आहे. पोपट हे सांगली जिल्ह्यातील आटपाटीचे रहिवासी आहे.
शैलजा दराडे शिक्षण संचालक म्हणून काम करत असताना 2019 साली त्यांनी राज्यातील 45 शिक्षकांकडून प्रत्येकी 12 लाख ते 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. डी .एड. झालेल्या शिक्षक उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी 12 लाख तर बी. एड. झालेल्या शिक्षक उमेदवाराकडून 14 लाख रुपये शैलजा दराडे तिचा भाऊ दादासाहेब दराडे मार्फत घेत होत्या. असा आरोप आहे.
पोपट सूर्यवंशी यांच्या नात्यातील दोन महिलांना नोकरी लावण्यासाठी 26 लाख रूपये दादासाहेब दराडे याने घेतले होते. दोन भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील नोकरी न लागल्याने पोपट सूर्यवंशी यांनी पैसै परत मागितले. पण दादासाहेब दराडे आणि शैलजा दराडे यांनी पेसै परत देण्यास नकार दिल्याने पोपट सूर्यवंशी यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शैलजाला तिचा भाऊ दादासाहेब दराडे यांनी केलेला हा प्रकार समजल्यानंतर तिने भावाशी संबंध तोडले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, पोपट सूर्यवंशी यांच्या व्यतिरिक्त अशाच प्रकारे या भावा-बहिणीने सुमारे 44 जणांना फसवलं आहे.सध्या या आरोपींना कलम 406, 420, 34 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिस स्टेशनचे असिस्टंट पोलिस इन्सपेक्टर Chetan Thorbole हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.