महाराष्ट्र (Maharastra) साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आङे. परंतु अतिप्रमाणात साखरचे उत्पादन झाल्याने बाजारात त्याच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साखर आणि कारखानदारांना काही समस्या उद्भवत आहेत. याच कारणामुळे 2020 पर्यंत उस उत्पादन 50 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्तवली आहे.
'साखर परिषद 20-20' चे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. या परिषदेला शरद पवार यांच्यासब अनेक साखरकारखानदारांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी शरद पवार यांनी असे म्हटले की, कारखान्यात मोठ्या प्रमाणात साखरेचा खप तसाच पडून आहे. या बद्दलचा प्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारकडून दिलासादायक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे. (मुंबईत येण्यासाठी आणखी 25 वर्ष टोल द्यावाचं लागणार)
त्याचसोबत साखरेपासून इथेनॉल तयार करण्याबाबत प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याबद्दल अद्याप काही गोष्टी स्पष्ट करण्यात आले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.