मुंबईत येण्यासाठी आणखी 25 वर्ष टोल द्यावाचं लागणार
Toll Plaza (Image: PTI)

मुंबईत (Mumbai) येण्यासाठी आखणी 25 वर्ष टोलनाक्यावर टोल भरावा लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. याबाबत एक सुचीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्याचसोबत वांद्रे-वरळी सीलिंकसाठी प्रवाशांना 2052 पर्यंत टोल भरावा लागणार असल्याचे ही म्हटले आहे.

मुंबईत प्रवेश करताना वाशी, ऐरोली, मुलुंड पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड लालबहादूर शास्त्री मार्गी आणि दहिसर हे पाच प्रवेशद्वार लागतात. या ठिकाणाहून प्रवास करताना लागणाऱ्या टोलनाक्यावर चालकाकडून 55 रुपये टोल वसूल केला जातो. मात्र पुढील वर्षापर्यंत या टोलच्या रक्कमेत 65 रुपयापर्यंत वाढ होणार आहे.(मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याने वाहतूकीच्या मार्गात बदल)

त्याचसोबत तीन वर्षानंतर टोलच्या रक्कमेत वाढ करण्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. तर रस्त्याच्या उभारणीसाठी झालेला खर्च आणि कर्जावरील व्याजाची वसुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे एमएअसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.