Pune News: पुण्यात भरधाव कारची एकापाठोपाठ सात वाहनांना धडक, अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
Accident (PC - File Photo)

Pune News:  पुण्यात (Pune) एका भरधाव कारने एकापाठोपाठ सात वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयाच उपचार सुरु आहे. अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील धनकवडी भागात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरात बराच वेळ नागरिकांचा गोधंळ होता.

माहितीनुसार, पुण्यातील धनकवडी भागात भरधाव कार एकापाठोपाठ सात वाहनांना धडक दिली. स्वातंत्र्यवीर चौकात अल्पवयीन मुलाचे कारवरिल नियत्रंण सुटल्यांने अपघात झाला. अपघातात सुरुवातीला एका कारला आणि रिक्षाला धडक दिली. त्यानंतर दुचाकीला आढळला. घटना घडताच तो घाबरून घटनास्थळावरून फरार झाला. आणखी काही वाहनांना धडक दिल्याची माहिती नागरिकांनी दिली. घटनेत तीन जण जखमी झाले. नागरिकांनी त्याच्या पाठलाग करत त्याला पुणे सातारा रस्त्यावरिल बालाजीनगर परिसरात पकडले.

अपघाताची माहिती मिळताच सहकारनगर पोलिस अपघात स्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शी  आणि नागरिकांनी पोलिसांना घटना सांगितली. या कारमधील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी जखमी लोंकांना रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती. पोलिसांनी मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवले. मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी मुलाने पालकांच्या नकळत कारची चाबी घेऊन कार चालवल्याचे समजले.