
Pune Crime News: पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. शहारतील कोंढावा परिसरातील मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघजकीस आली आहे. १० नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मशिदीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. कोंढावा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार घेण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा केला आहे.
पीडित मुलाच्या मामाने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. माहितीनुसार, मोहम्मद युसुफ असं आरोपीचे नाव असून त्याच्यावर पोक्सो (POSCO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याची माहिती मिळताच, सद्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. १० नोव्हेंबर रोजी मित्रासोबत पीडत मुलगा नमाज पठणासाठी उस्मानिया मशिदीत गेला. तेथे आरोपी सुध्दा उपस्थित होता. नमाज पठण झाल्यानंतर मित्रासोबत उभा असताना आरोप त्यांच्या जवळ आला आणि त्यांना एका नमाज बद्दल थोडी माहिती दिली. त्यानंतर सर्व मित्रांना जाण्यास सांगितले आणि पीडित मुलाला घेऊन मशिदजवळी राहत्या घरी घेऊन गेला.
त्यानंतर आरोपीने मुलावर लैंगिक अत्याचार केले. घरी गेल्यानंतर तो खुप घाबरला. दुसऱ्या दिवसापासून तो मशिदित गेलाच नाही. या बद्दल घरांच्यानी विचारणा केली. पण त्याने काही सांगितले नाही. १० दिवसांनंतर हा प्रकार घरच्यांना सांगितला. घडलेला प्रकार मामाल सांगितला आणि नातेवाईकांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी मोहम्मद युसुफवर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीवर कडक कारवाईची मागणी नातेवाईंनी केली.