देशात महिला अत्याचार आणि बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाहीत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच भोपळच्या (Bhopal) कमला नगर (Kamla Nagar) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर येत आहे. या परिसरात लग्नाचे आमिष (Pretext of Marriage) दाखवत एका महिलेवर सतत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलागी मंदसौरची असून ती बैरागगड येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. तसेच ती एमपी परीसरातील एका खाजगी फर्ममध्ये काम करते. या कार्यालयात कार्यरत असलेल्या हबीबगंज येथील रहिवासी अनुज पराशरने लग्नाचे आमिष दाखवत सतत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडिताने एजेके पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनुजवर गुन्हा दाखल करीत पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Rajasthan: धक्कादायक! कानात Bluetooth Earphone चा अचानक झाला स्फोट; 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पीडिता आणि आरोपी यांच्यात जून 2020 मैत्री झाली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार तिच्यावर बलात्कार केला आहे. एक महिन्यापूर्वी पीडिताने लग्नाबाबत विचारले. त्यावेळी आरोपीने तिला शिवीगाळ केली. तसेच जातीचा टोमणा मारत तिचा अपमान केल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी एजेके पोलीस तपास करीत आहेत.
याशिवाय, उत्तर प्रदेशमध्ये कॅन्डी देण्याचे आमिष दाखवत एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी घरा शेजारील दुकानात गेली असताना तिच्यावर अत्याचार झाले आहेत. याप्रकरणातील आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.