Murder | (Photo Credits: PixaBay)

पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 31 वर्षीय व्यक्तीने आपल्या आईची हत्या केली आहे. चिन दत्तोपंत कुलाठे (Sachin Dattopant Kulathe) असे या आरोपीचे नाव असून त्याने चाकूने वार करत आपल्या आईची हत्या केली. आईने दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांना (Sinhagad Road Police) घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पुण्याच्या नर्हे भागात राहत्या फ्लॅटमध्ये घडली. (Pune: गरोदर महिलेस डॉक्टरांकडून अमानुष मारहाण; नामांकित रुग्णालयातील धक्कादायक प्रकार)

प्राप्त माहितीनुसार, सचिन बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. त्यामुळे दारु खरेदी करण्यासाठी त्याने आपल्या 60 वर्षीय वृद्ध आई विमल (Vimla) यांच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु, पैसे नसल्याचे सांगत आईने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या सचिनने धारदार चाकूने आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. (Pune Gangrape and Murder Case: 19 वर्षीय मुलीवर दीर आणि त्याच्या मित्राकडून बलात्कार; ओळख मिटवण्यासाठी क्रुर हत्या)

आईची हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पोलिसांच्या भीतीने बहिणीला भेटायला गेला. त्याने बहिणीला सारे काही सांगितले. त्यानंतर बहिणीने थेट सिंहगड पोलिस स्टेशन गाठले आणि भावाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याचबरोबर मागील सात दिवसांपासून तो आईला मारहाण करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बहिणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.