Pune Gangrape and Murder Case: 19 वर्षीय मुलीवर दीर आणि त्याच्या मित्राकडून बलात्कार; ओळख मिटवण्यासाठी क्रुर हत्या
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात महिला अत्याचाराची अजून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यात 19 वर्षीय महिलेवर कथित बलात्कार (Rape) करून तिची हत्या (Murder) करण्याचा आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार पीडीतेच्या दीराने आणि त्याच्या मित्राकडून करण्यात आला आहे. ही घटना पुणे (Pune)  जिल्ह्यातील मौजे सोमटणे (Mauje Somatane) या गावातील आहे. नक्की वाचा: Pune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडीता दीरासोबत मौजे सोमटणे येथील एका देवळात देव दर्शनासाठी गेली होती. दीराने त्याच्या मित्राला देखील बोलावले होते. देवळाजवळ असलेल्या झुडूपामध्ये पीडीतेला घेऊन जात दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. ती जसा प्रतिकार करत होती तसे दोघांनी स्कार्फने तिचा गळा आवळून हत्या केली. पीडीता ओळख मिटवण्यासाठी तिचा चेहरा देखील दगडाने विद्रुप केला.

तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन मध्ये संबंधित प्रकाराबद्दल सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून दुसर्‍या आरोपीचा शोध सुरू आहे.

मागील महिन्यात सोमटणे गावात अशाच प्रकारे एका तरूणीचा खून करण्यात आला होता. दीराने त्याच्या मित्रासोबत वहिनीवर बालात्कार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर जवळच असलेल्या एका टेकडीवर झाडाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता.