भीमा कोरेगाव प्रकरणात सुधा भारद्वाज, वरावरा राव, सुरेंद्र गडलिंग यांच्यासह 9 आरोपींना पुणे सत्र न्यायालयाचा दणका; जामीनपत्र नाकारले
Bhima Koregaon case Accused (File Image)

देशातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हिंसाचाराचे उदाहरण असलेल्या भीमा कोरेगाव (Bhima Koregaon Case) प्रकरणाने देशभरात खळबळ माजली होती. हा हिंसाचार घडवून आणण्याच्या आरोपाखाली अनेकांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. यातील 9 जणांनी काही दिवसांपूर्वी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र पुणे सत्र न्यायालयाने (Pune Session Court) हे जामीनपत्र फेटाळून लावले असून तूर्तास तरी यापैकी कोणालाही दिलासा मिळणार नसल्याचे समजत आहे. या ९ जणांमध्ये सुरेंद्र गडलिंग (Surendra Gadling), वरवरा राव (Varavara Rao), सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj), वर्णन गोन्साल्विस (Vernon Gonsalves),अरुण फरेरा (Arun Feraria), शोमा सेन (Shoma Sen), महेश राऊत (Mahesh Raut), आणि रोना विल्सन (Rona Wilson) या आरोपींचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी देखील 15 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कार्यकर्ते सुधा भारद्वाज , अरुण फरेरा आणि वर्णन गोन्साल्विस यांना  जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र त्यांनतर पुन्हा या सर्व कार्यकर्त्यांनी न्यायालयाकडे फेरविचारासाठी अर्ज करत जामीनपत्र दिले होते.

Koregaon Bhima Anniversary 2019 : 201 वर्षांपूर्वी भीमा -कोरेगाव येथे काय घडलं ज्यामुळे 1 जानेवारी शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो

ANI ट्विट

कोरेगाव भीमा लढाईच्या विजयाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मृतिप्रित्यार्थ 1 जानेवारी 2018 दिवशी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनाने एकाएकी हिंसक वळण प्राप्त केले हा हिंसाचार घडवून आणण्यामागे माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप करत पुणे पोलिसांनी आरोपींवर 1,837 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला मागील एक वर्षापासुन प्रलंबित आहे आणि अशातच या आरोपींना न्यायालयांकडून कोणताही दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.