पुण्यातील सदाशिव पेठ येथे झालेला अॅसिड हल्ला, गोळीबार आणि आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचे कोडे आता उलघडले आहे. विनयभंगाची तक्रार दाखल केल्याचा राग असल्याने मृत आरोपी सिद्धराम कलशेट्टी (Siddharam Kalshetty) याने अॅसिड हल्ला करत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अॅसिड हल्ला पीडित रोहित थोरात (Rohit Thorat) याच्या संपूर्ण कुटुंबावरच सिद्धराम याचा राग असल्याची माहिती समोर येत आहे. (पुणे: तरुणावर अॅसिड हल्ला,आरोपीने गोळ्या झाडून केली आत्महत्या)
नेमके काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी रोहित थोरात याची आई आणि आरोपी सिद्धराम याची फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर आरोपी सिद्धराम याने रोहितच्या आईला अश्लील मेसेज पाठवले होते. याबद्दल रोहितच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर सिद्धराम याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेचा राग असल्याने आरोपीने अॅसिड हल्ला करण्याचा कट आखला. संपूर्ण कुटुंबावरच राग असल्याने सगळ्यांचाच काटा काढण्याचे त्याचे नियोजन होते. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्या बॅगेत दोन मोठे कोयते आणि दोन चाकू देखील आढळून आले आहेत.
पुण्यातील सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं?
पुण्यातील सदाशिव पेठेतील नवी पेठ येथे 16 एप्रिल रोजी आरोपी सिद्धराम कमशेट्टी याने रोहित थोरातवर अॅसिड हल्ला करुन त्याच्या पाठीवर गोळी झाडली. त्यानंतर तो जवळच्या इमारतीत लपून बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांना आरोपीला पकड्यात यश आले. मात्र भीतीपोटी आरोपीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.