Covid-19 Update In Pune: पुणे शहरात आज 1691 कोरोना संक्रमित रुग्णांची भर, तर महापालिका हद्दीत 43 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Covid-19 Update In Pune: राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यांचा आलेख दिवसेंदिवस चढता होत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज नव्याने 1 हजार 691 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 22 हजार 448 इतकी झाली आहे.

पुणे महापालिका हद्दीत आज नव्याने 43कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 2 हजार 875 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 17 हजार 478 रुग्णांपैकी 929 रुग्ण गंभीर असून यातील 473 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 456 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. (हेही वाचा -पुणे: कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांंनी हल्ला करत स्वॅब नमुने फेकुन दिले, कारण वाचुन माराल डोक्यावर हात (Watch Video))

दरम्यान, पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 494 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 5 लाख 42 हजार 946 इतकी झाली आहे. याशिवाय आज शहरातील 1563 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1 लाख 02 हजार 095 झाली आहे. पुणे शहरात कोरोनाबाधितांची एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 17हजार 478 झाली आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे 6 हजार 886 रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये 10 हजार 592 रुग्ण उपचार घेत आहेत.