पुणे शहराला काल (21 ऑक्टोबर) रात्री पावसाने झोडपल्यानंतर आज पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तुंबई झालेल्या पुण्यातून अनेकांना वाट काढावी लागत आहे. पुणे शहरात सखल भागात पाणी साचल्याने अनेक सोसायटींमध्येही पाणी घुसले आहे. पद्मावतीच्या गुरुराज सोसायटी, येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, पद्मावती, मार्केट यार्ड परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी शिरले पाणी आहे. तर आंबिल ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कात्रज, नवीन वसाहत पाण्याचा प्रवाहामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियामध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचे काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.लोहगाव भागातील सोसायटींमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. सखल भागामध्ये सोसयटींमध्ये पाणी घुसल्याने दुचाकी वाहून गेल्या आहेत. तर पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी काम दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यासोबतच काल रात्री मुंबई शहरामध्येही वीजांच्या कडकडाटासह, मेघगर्जना झाल्या. अशातच तासभर कोसळलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. Maharashtra Monsoon Forecast 22nd october: विदर्भासह पुण्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता; तर मुंबईत येत्या 24 तासांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार.
पहा मुसळधार पावसानंतर पुणे शहरातील स्थिती
#Pune #punerains Midnight pour..
Water logging across the city. APics from #Kondhwa, #Wanowrie, #Hadapsar/ #Magarpatta area, #Mundhwa pic.twitter.com/i8o4cLMxC7
— Parag Joshi (@ParagJoshiIndia) October 22, 2019
स्वारगेट बस स्थानकातील स्थिती
Swargate Bus Stand, full of People, Buses and Water....😮 #punerains #Pune pic.twitter.com/yYrnNEFP9X
— सायली (Sayali) (@RSayaali) October 22, 2019
Lohegaon-Wagholi Road waterlogged. Please avoid.#punerains @PuneCityTraffic @puneruralpolice @TrafficSahayak pic.twitter.com/kaBHAGSmxX
— Ravi Bhuptani (@BhuptaniRavi) October 22, 2019
Lohegaon-Wagholi Road waterlogged. Please avoid.#punerains @PuneCityTraffic @puneruralpolice @TrafficSahayak pic.twitter.com/kaBHAGSmxX
— Ravi Bhuptani (@BhuptaniRavi) October 22, 2019
Raining unbelievably in pune. Same intensity since 2 hours almost. Getting scarier. #punerains #WeatheringWithYou pic.twitter.com/to4UA3pE4d
— Chandra Sekhar (@chanduiith) October 21, 2019
पुणे शहरामध्ये पुढील 24-48 तासांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान शाळेकडून वर्तवण्यात आली आहे. एकीकडे सारे दिवाळीची तयारी करत असताना कोसळणारा दमदार पाऊस या सणाच्या उत्साहावर पाणी फिरवणार असल्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.