फोटो सौजन्य - PTI

पुणे (Pune) येथील एका नामांकित शाळेत पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट मिळाल्याने तेथील स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. तसेच नागरिकांकडून या प्रकरणी विविध तर्कवितर्क काढले जात आहेत.

पोलिसनामा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कॅम्प परिसरातील एका शाळेत पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट अचानक सापडला. या प्रकरणाची माहिती मिळताच तेथील स्थानिक लोकांनी तातडीने याबद्दल पोलिसांना सांगितले. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट येथे कसा आला किंवा कोणता गुन्हा घडला आहे का याबद्दल अद्याप पोलिसांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.(नाशिक: सप्तशृंगी गडाजवळच्या शिखरावर देवदर्शनावेळी भांडण झाल्याने संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला 800 फूट दरीत ढकलले)

परंतु प्रायव्हेट पार्ट तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र प्रयोगशाळेतील रिपोर्टनंतर यामागील सत्य समोर येईल असे सांगण्यात येत आहे. तर या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.