Sassoon Hospital | .wikipedia

पुण्याच्या कल्याणी नगर भागात पोर्शे कार (Pune Porsche Car) याचे डीन डॉ विनायक काळे (Dr Vinayak Kale ) देखील देखील रडार वर आले आहेत. ANI च्या वृत्तानुसार त्यांना देखील तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. डॉ.काळे यांच्या जागी बारामतीतील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के (Dr Chandrakant Maske) यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

रक्ताचे नमूने फेकून देत दुसर्‍याच रक्ताच्या आधारे रिपोर्ट बनवल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. एका डॉक्टरने ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून तीन लाखांची लाच घेतल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

ससूनचे डीन सक्तीच्या रजेवर

गेल्या आठवड्यात पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. विभागाच्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ते काम करत असून पुढील आठवड्यात अहवाल सादर करण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. 19 मे रोजी पोर्श कार चालवणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीने पुण्यातील कल्याणीनगर येथे मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. १७ वर्षीय आरोपी दारूच्या नशेत कार चालवत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.