Pune Porsche Car Accident Update: पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रायव्हरचाही कुबुली जबाब

पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला (Pune Porsche Car Accident) आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेल्या कारचालक मुलाचे वडील विशाल अग्रवालची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. विशाल अग्रवालची पोलीस कोठडी आज संपली. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालसोबत इतर 5 ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा -  Ravindra Dhangekar on Protest in Pune: पुणे पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, पुणे पोर्शे कार अपघातामधील तपास अधिकारी डिफॉल्टर असल्याचा रविंद्र धंगेकर यांचा दावा)

पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे. विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

पोलीस कोठडी संपल्यानंतर आज आरोपींना शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी 7 दिवसांनी वाढून देण्याची मागणी केली. पण पोलिसांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली. कोर्टाने विशाल अग्रवालला 7 जूनपर्यंत म्हणजे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर इतर 5 आरोपींना देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोर्शे गाडी कोण चालवत होते हा संभ्रम निर्माण करण्यात आला होता. याबद्दल ड्रायव्हरने आपण गाडी चालवत नसल्याचे स्पष्ट केले आहे.