पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघाताची मोठी चर्चा आहे. एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना उडवल्याच्या घटनेचे आणि त्यानंतर पोलिस तपासावर जनतेने संताप व्यक्त केल्यानंतर पुन्हा सारी यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकरणामध्ये पुणे लोकसभेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याप्रकरणातील तपास अधिकारी डिफॉल्टर असल्याचा त्यांनी दावा केला आहे. यासाठी आज ते सीपी कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)