
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहे. आता या पालख्या पुण्यात आहेत. या पालखीसोहळ्यात शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी समोर चालण्यास मनाई केली आहे.तसेच संभाजी भिडे यांनाही नोटीस बजावली आहे. त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या असं म्हटलं आहे.
संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठलेही शस्त्र घेऊन पालखीत सहभागी होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. दिड्यांची शिस्त न मोडता आणि पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यात केले आहे. भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही, असं आळंदी देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर भिडे गुरुजी थोड्याच वेळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणारं आहेत. वारीत सहभागी होण्याआधी भिडे गुरुजी यांनी दरवर्षीप्रमाणे जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतलं आहे.
काही वर्षापूर्वी पुण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी सुमारे एक हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी भिडे गुरुजी संघटनामधील काही व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी आणि डोक्याला फेटे घालत प्रवेश केला होता. यावरुन मोठा गोंधळ झाला होता. यंदा यामुळे गोंधळ टाळण्यासाठी पालखी सोहळा समितीच्या वतीने यावेळी देखील पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावण्यात आली आहे. Pimpri Chinchwad Traffic Advisory: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधील वाहतूक व्यवस्थेतील बदल इथे पहा थेट Google Map वर!
17 जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पालख्यांसोबत वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.