पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम (PC 0 ANI)

Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे शहरातील (Pune City) सर्व प्रकारची वाहतूक (Transport) आज दुपारी 3 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत बंद (Vehicle Ban) होणार आहे. यासंदर्भात पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यात कलम 144 लागू केलं आहे. या कलमाची करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. के. व्यंकटेशम यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. (हेही वाचा - लॉकडाऊन नंतरही होत असणारी गर्दी धक्कादायक; घरीच सुरक्षित राहण्याची सुप्रिया सुळे यांची कळकळीची विनंती)

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी कधीही अशा स्परुपाचा निर्णय घेण्यात आला नव्हता. सध्या शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यात केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना बाहेर जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शहरात फिरता येणार नाही.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 400 च्या वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासात 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.