पिंपरी: दुकानात बेवड्यांचा हैदोस, मालकाच्या डोक्यात दारुच्या बॉटल्स फोडत केली मारहाण
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील एका दारुच्या दुकानात बेवड्यांनी हैदोस घातला. एवढेच नाही तर दुकान मालकाच्या डोक्यात देशी दारुच्या बॉटल्स फोडत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेवड्यांनी घातलेला हा धुमाकूळ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बुधवारी दुपारच्या वेळेस काही दारुच्या नशेत असलेल्या तीन व्यक्तींनी दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश केल्यावर प्रथम टीव्ही फोडला. त्यानंतर गल्ल्यावर बसलेल्या मालकाला दोघांनी मारहाण करत त्याच्या डोक्यात देशी दारुच्या बॉटल्स फोडत कोयत्याने वार केले. हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

(पुणे: नामांकित शाळेत पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट मिळल्याने नागरिकांमध्ये खळबळ)

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा सुगावा काढत त्यांना अटक केली आहे. तर आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.