Gautam Pashankar missing | Photo Credits: Facebook

पुण्यामध्ये Pashankar Auto चे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) हे आश्चर्यकारकपणे बेपत्ता झाले आहे. बुधवार, 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळी घराबाहेर पडलेले पाषाणकर त्यांच्या घराजवळच रस्त्या ओलांडताच गायब झाले आहेत. सध्या पुण्यामध्ये त्यांचा शोध सुरू असून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

65 वर्षीय पाषाणकर हे शिवाजी नगर परिसरात राहतात. तेथेच बुधवारी ते काही कामानिमित्त घराबाहेर पडले. लोणी काळभोर भागात कौटुंबिक व्यवसायाचा एक भाग असलेल्या गॅस प्लांटला त्यांनी भेट दिली. त्यानंतर घरी परतत असताना संध्याकाळी साडे चारच्या सुमारास त्यांनी चालकाला रस्त्यामध्ये गाडी थांबवण्यास सांगितले. ड्रायव्हरला चेक घेण्यासाठी पाठवले आणि त्यांनी रस्ता क्रॉस केला. मात्र नंतर ते घरीच परतलेच नाहीत.

पाषाणकर कुटुंबियांनी रात्रीपर्यंत वाट पाहिली मात्र ते घरीच परतले नाही अखेर त्यांनी शिवाजी नगर पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली आहे. पुणे मिरशी बोलताना त्यांचा मुलगा कपिल याने दिलेल्या माहितीनुसार, गौतम पाषाणकर यांना कोणताही आजार, त्रास नव्हता. कौटुंबिक वाद नव्हता, कर्ज नव्हतं. नुकताच त्यांचा 65 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यांच्या बेपत्ता होण्यामागील कारणंच अस्पष्ट आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम यांच्या ड्रायव्हरकडे त्यांनी एक लिफाफा दिला होता. त्यामध्ये सुसाईड नोट सापडली आहे. (नक्की वाचा: त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची भरदिवसा गळा चिरून हत्या).

दरम्यान पाषाणकर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मोबाईल फोन घरीच ठेवून गेले आहेत. सध्या शिवाजी नगर पोलिस स्टेशन सोबतच पुण्यातील इतर भागातील पोलिस तुकड्या देखील गौतम पाषाणकर यांचा शोध घेत आहेत. त्यांचा फोटो पुण्यात सर्वत्र जाहीर करण्यात आले आहेत.