पुण्यातील नवले पुलाजवळ (Pune Navale Bridge Accident) दोन कंटेनरची धडक झाल्याने एका कंटेनरनी पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत कंटानरच्या केबीनमधे बसून प्रवास करणारे एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यूमुखी पडलेत. तर इतर जखमी झालेत. या दोन्ही कंटेनरला लागलेली आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसापासून पुण्यातील (Pune Accident) नवले पुलावर अपघाताचे सत्र हे सुरुच आहे. आज संध्याकाळी उशीरा पुणे-बेंगलोर हायवेवर असलेल्या या पुलावर दोन कंटेनरची एकमेकांना धडक बसली. (हेही वाचा - Bridge Collapsed In Chiplun: चिपळूणमध्ये भीषण अपघात, बांधकामाधीन पूल कोसळला; घटना कॅमेऱ्यात कैद, Watch Video)
#पुणे #नवलेपूल, स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातात ट्रकने पेट घेतला. यात ४ जण जखमी. #पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ४ वाहने दाखल #punefire#pune#punenews pic.twitter.com/drwUqANrl4
— Brijmohan Patil (@brizpatil) October 16, 2023
या अपघातात गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली आहे. परंतु नवले पूल हा किती धोकादायक आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या पुलाची रचना चुकीची असल्याचं अनेकांनी वेळोवेळी निदर्शनास आणली आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने यावर कोणतीही कारवाई केली नाही.