पुणे (Pune Crime) येथील कोंढवा (Kondhwa) परिसरातील उंड्री येथे एकाची डोक्यात हातोडा मारुन हत्या करण्यातत आली आहे. पीडित व्यक्ती हा हा बांधकाम मजूर आहे. ही घटना एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली. शुभम शास्त्री सरकार (वय 63, रा. पश्चिम बंगाल) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्या करणारा आरोपी कमल नारायण मार्डी (वय 49, रा. जियापूर, पश्चिम बंगाल) यास अटक केली आहे. कोंढवा परिसराती उंड्री यते गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पावर काही मजूर काम करतात. त्यातील काही मजूर हाताने जेवण बनवतात. या जेवणाची चव न (Tasteless Food) आवडल्याने आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे.
दोन कामगारांमधील वाद टोकाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथील एका गृहप्रकल्प योजनेवर अनेक मजूर काम करतात. त्यातील काही मजूर प्रकल्पाच्या ठिकाणीच कामगार वसाहत स्थापन करुन राहतात. याच वसाहतीत आरोपी मार्डी आणि पीडित सरकार एकत्र राहायला होते. दरम्यान, हे मजूर आपले जेवण स्वत: च बनवतात. घटना घडली त्या दिवशी हे जेवण शुभम शास्त्री सरकार यांनी बनवले होते. नेहमीच्या वेळेस आरोपी कमल नारायण मार्डी हा देखील तिथे जेवणास आला. त्याने जेवणाची चव चाखली असता त्याला ती आवडली नाही. यातूनच आरोपी आणि पीडित यांच्यात वाद झाला. केवळ जेवण पसंत पडले नाही, या कारणास्तव आरोपीने पीडिताच्या डोक्यात हातोडा घातला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. (हेही वाचा,Noida Murder Case: पतीच्या डोक्यात हतोडा घालून केली हत्या, आरोपी पत्नीला अटक; नोएडा येथील खळबळजनक घटना )
पीडिताचा उपचारादरम्यान मृत्यू
घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ हजेरी लावली. तेव्हा, शुभम शास्त्री सरकार याच्या डोक्यावर गंभीर जखम होती. आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपी मार्डी यास अटक केली. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पाठिमागील काही दिवसांपासून पुणे शहर जोरदार चर्चेत आहे. सुरुवातीला हे शहर चर्चेत आले अल्पवयीन मुलाने आपल्या आलीशान पोर्श कारने दोघांना चिरडल्यानंतर. त्यानंतर तशीच घटना पिंपरी चिंचवड शहर परिसरातही घडली. दरम्यान, एका महिला आयएएस अधिकाऱ्याने केलेल्या कारमनाम्यांमुळेही हे शहर जोरदार चर्चेत आहे. असे असतानाच आता चक्क पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा फोटो व्हॉट्सअँप आणि तत्सम सोशल मीडियावर डीपी म्हणून ठेवत पैसे उकळण्याचा कारणामा पुढे आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होणार तरी कधी आणि कशी असा सवाल उपस्थित केला जातो आहे.