Pune Coronavirus Lockdown: पुणे मध्ये आजपासून 23 जुलै पर्यंतच्या 2 टप्प्यातील कडक लॉकडाऊनला सुरूवात
Pune Coronavirus Lockdown| Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरीही ठाणे, पुणे शहरात दिवसागणिक वाढणारी कोरोना रूग्णांची स्थिती पाहता आता पुणे शहरामध्ये पुणे मनपा (Municipal Corporation) कडून 14 जुलै ते 19 जुलै आणि 19 जुलै ते 23 जुलै असा दहा दिवसांचा लॉकडाऊन 2 टप्प्यांत पुन्हा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 14 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजल्यापासून लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर आता सकाळपासून नाक्यानाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला जात आहे. तर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन पुणे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान आजपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये 18जुलै पर्यंत पुणेकरांना सर्व किराणा माल दुकान, व्यापारी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश आहे. 19 जुलै पासून किराणा माल दुकानं सकाळी 8-12 या वेळेत सुरू राहतील. तर या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवेत असतील. तर उद्योग आणि आयटी कंपनीमध्ये 15% मनुष्यबळासह कार्यालयं सुरू राहणार आहेत. मात्र इतर अनावश्यक गर्दी टाळून कोरोनाचा पुणे शहरातील फैलाव रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. Lockdown In Pune: पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; जिल्ह्यात नेमके काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून

पुणे मनपा मधील कडक लॉकडाऊनला आजपासून सुरूवात 

Pune Lockdown: आजपासून पुण्यात कडकडीत बंद; पाहा काय राहणार सुरु आणि काय बंद - Watch Video

पुणे मध्ये काल (13 जुलै)  रात्री पर्यंत पुणे मनपा मध्ये एकूण 29612 रूग्णांची नोंद आहे तर 897 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 6815  रूग्णांची नोंद आहे तर 123 मृत्यू नोंदवले गेले आहेत.