पुणे: मॉल्स-मल्टिप्लेक्स येथे नागरिकांना मिळणार मोफत कार पार्किंग
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे (Pune) येथे नागरिकांना आजपासून मॉल्स-मल्टिप्लेक्स मध्ये मोफत कार पार्किंग करता येणार असल्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. पुणे महापालिकाने निर्णय घेण्यात आला असून नागरिकांना नि:शुल्क कार पार्किंग करता येणार असल्याचे म्हटले आहे. याबद्दल मॉल आणि मल्टिप्लेक्सला महापालिकेने नोटीस सुद्धा दिल्या आहेत.

गेल्या आठवड्यात पुण्यात नागरिकांना कार पार्किंगसाठी लूट थांबविण्यासाठी नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला. तर वाहनाचा आकार आणि तासानुसार गाडीचे भाडे अवाजवी स्विकारले जाते. त्यामुळे वाहनचालक अवाजवी भाडे देण्यासाठी काचकूच करतात. म्हणूनच नि:शुल्क कार पार्किंगची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे.(अवैध पार्किंग करणा-यांस आता भरावा लागणार 10,000 रुपयांचा भुर्दंड)

पुणेकरांना त्यांच्या येथे असणाऱ्या मॉल्स आणि मल्टिपेक्समध्ये वीस रुपयांपासून ते शंभर रुपयापर्यंत कार पार्किंगचे भाडे स्विकारले जाते. परंतु कार पार्किंग नि:शुल्क झाल्यास पुणेकरांना या त्रासापासून दिलासा मिळेल.