Central Railway Update: मुंबई-पुणे मार्गावर  28-30 जून दरम्यान 8 ट्रेन रद्द; पहा सविस्तर वेळापत्रक
Train | (Photo Credits: X)

पुण्याच्या मध्य रेल्वेच्या (Central Railway) दौंड-मनमाड सेक्शन दरम्यान पुणतांबा ते कान्हेगाव मध्ये तातडीच्या डबलिंग कामामुळे मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक 28 जून ते 30 जून दरम्यान विस्कळीत राहणार आहे. यामध्ये 8 गाड्या रद्द होणार आहेत. रद्द होणार्‍या गाड्यांमध्ये इंटरसिटी एक्सप्रेस, सीएसएमटी पुणे डेक्कन एक्सप्रेस यांचा समावेश आहे. लांबपल्ल्ल्यांच्या देखील काही ट्रेन्स रद्द होणार आहे.

पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस - 28 जूनला, सीएसएमटी पुणे डेक्कन एक्स्प्रेस, 29 जूनला, सीएसएमटी पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 29जूनला, पुणे-सीएसएम्टी इंटरसिटी एक्सप्रेस 29 जूनला रद्द असणार आहे.

मध्य रेल्वेने जारी परिपत्रकामध्ये, "कान्हेगाव आणि पुणतांबा दरम्यान सुधारित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विभागाच्या दुहेरीकरणाच्या तयारीच्या कामामुळे, दौंड-मनमाड दरम्यान धावणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्या पुणे-लोणावळा-कल्याण-इगतपुरी येथून वळवण्यात आल्या आहेत. - पुणे-लोणावळा विभागात काम होणार असल्याने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून त्यामुळे पुणेकरांची आणि मुंबईकरांची गैरसोय झाली आहे रद्द केल्याबद्दल मनापासून खेद आहे." असे नमूद करण्यात आले आहे.